नागपूर दि. 15 :
माहिती व जनसंपर्क कार्यालय, श्रमिक पत्रकार
संघ आणि प्रेस क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रेस क्लब येथे
राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या कार्यक्रमाचे
उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ
पत्रकार ल. त्र्यं. जोशी यांचे 'आजची पत्रकारिता व
समाजमाध्यमे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, प्रेस क्लबचे
अध्यक्ष प्रदीप मैत्र, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस
ब्रह्माशंकर त्रिपाठी, पत्रकार संघ, नागपूरचे
अध्यक्ष शिरिष बोरकर आणि जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे उपस्थित
राहणार आहेत. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला सर्व माध्यमकर्मी, पत्रकारितेचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment