मुंबई, दि. 15 : केंद्र
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान “कौमी एकता सप्ताह” साजरा करण्यात
येणार आहे. या काळात अनुक्रमे राष्ट्रीय एकात्मता दिवस, अल्पसंख्याक
कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, ध्वजदिन
तसेच दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन आणि जोपासना दिवस साजरे होणार असून त्याअंतर्गत विविध
सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
१९ नोव्हेंबर रोजी
शासनाच्या विविध कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. तसेच
राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर आठवडाभर
दुर्बल घटकतील व्यक्तींना इंदिरा आवास योजना आणि घरांचे वाटप, भूमिहीन
मजुरांना जमिनीचे वाटप, गरिबांना कायदेविषयक सहाय्य देणे,
चर्चा संमेलने, मिरवणुका आणि सभा इत्यादी
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कौमी एकता
सप्ताहामध्ये “सांप्रदायिक सद्भावना
मोहीम निधी संकलन सप्ताह” साजरा करण्यात
येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन
शासनाने केले आहे. हे शासन परिपत्रक www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
००००
No comments:
Post a Comment