Friday, 15 November 2019

दिलखुलास कार्यक्रमात ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र


मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्युज ऑन एअर या ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
              ‘आपला महाराष्ट्रया वार्तापत्रात दर आठवड्यात राज्यातील विविध भागात घडलेल्या घटना, घडामोडी, शासनाचे महत्वाचे निर्णय यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगलीअहमदनगर, अकोलाअमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गउस्मानाबाद, सातारा, सोलापूर,यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून हे वार्तापत्र प्रसारित  केले जाणार आहे.
००००

No comments:

Post a Comment