नागपूर दि.20 : महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत जिल्हास्तरावर चाचा नेहरु बाल महोत्सवाचे बक्षिस वितरण व ऑकेस्ट्रा कार्यक्रम उद्या गुरुवार, (दि.21) रोजी, दुपारी 1 वाजता जंक्शन-फंक्शन सभागृह, काटोल रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
महिला व बाल विकास विभागांर्तगत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव तसेच महिला व बालविकास आयुक्त उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे यांनी दिली.
*******
No comments:
Post a Comment