नागपूर, दि. 15: पंडित
जवाहरलाल नेहरु यांची जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करतो. आजच्या काळातील बालक तसेच
पालक यांच्या पुढील आव्हाने आधीच्या पिढीपेक्षा वेगळी आहेत. त्यांचा विचार करून बालकांचा विकास कसा होईल, याचा विचार पालकांनी करावा असे विभागीय
ग्रंथपाल श्रीमती विभा डांगे यांनी सांगितले.
शासकीय विभागीय ग्रंथालय येथे दिवाळी
अंकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती
अधिकारी श्रीमती शैलजा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करुन
भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस
पुष्पहार अर्पण केला. यावेळी ग्रंथपाल श्रीमती वि.मु.डांगे, जिल्हा माहिती अधिकारी यांनी श्रीमती शैलजा वाघ यांचे
पुस्तक भेट देऊन स्वागत केले. सहाय्यक ग्रंथपाल संचालक श्रीमती मि.रा. कांबळे
यांचे पुस्तक भेट देऊन श्रीमती माधुरी बोकडे यांनी स्वागत केले.
ग्रंथपाल श्रीमती वि.मु.डांगे यांनी दिवाळी अंकाची परंपरा
ही शंभर वर्षांपेक्षा जास्त असूनही उत्साहाने सुरुच आहे आणि या पुढेही सुरुच
राहणार असे सांगितले. दिवाळी अंकात संपूर्ण वर्षभरात घडलेल्या घटनांचे प्रतिबिंब
पडलेले असते. वाईट विचार बाजूला करून नवीन चांगले विचार मांडले जातात. या
कार्यालयाने सर्व समावेशक असे दिवाळी अंक प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून
दिले असून त्याचा सर्व वाचक मंडळींनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ यांनी पंडित
जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपण बालक दिन म्हणून साजरी करतो. मराठीतच नव्हे इतर
भाषेत सुद्धा बाल साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, कथा, कादंबरी या व्यतिरिक्त निरंजन घाटे, जयंत नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेली
पुस्तके मुलांनी जरुर वाचली पाहिजे, असे सांगितले.
दिवाळी अंकाची सन 1909 पासून मनोरंजन मासिकापासून सुरू
असलेली परंपरा सुरूच असून दिवाळी अंक वाचनातून ज्ञान, माहिती आणि मनोरंजन होते. आपले मन, मनगट आणि मस्तक जर बळकट असेल तर आपण कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो.
वाचनाची आवड ही उपजतच असावी लागते. ज्यांना आवड असते त्यांना वाचन केल्याशिवाय चैन
पडत नाही. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून पण वाचनाची आवड जोपासता येते. परंतु खरे
समाधान हे पुस्तकातून पूर्ण होते. शासकीय विभागीय ग्रंथालय, कार्यालयाने
साहित्य, शिक्षण, ज्ञान,आरोग्य, पाककला,भविष्य, वि नोदी,बालसाहित्य
अशा विविध प्रकारच्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला हे पाहून
समाधान व्यक्त केले. समाजात वाचनाची आवड, वाचन संस्कृती
रुजविण्याकरिता व वाढविण्याकरिता अशा माध्यमातून केले जाते आणि ही काळाची गरज आहे.
यावर्षी कमीत कमी 20 दिवाळी अंक वाचण्याचा निश्चय केला असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रीमती मि.रा. कांबळे, यांनी बालदिनाचे महत्त्व आणि आजच्या
काळातील बालक पालक यांच्या पुढील आव्हाने सांगितली. तसेच वाचनसंस्कृती
वाढविण्याकरिता दिवाळी अंकाच्या प्रदर्शनासारखे कार्यक्रम आवश्यक असल्याचे
सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी राहुल
मेंढे यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सहायक र.वा.शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला
मोठ्या प्रमाणात विध्यार्थी, वाचक आणि कार्यालयीन कर्मचारी
उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment