Friday, 15 November 2019

बालकामगार उच्चाटन ही सामूहिक जबाबदारी - अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे


            नागपूर,दि.15: समाजामध्ये बालकामगार असणे हा समाजावरील कलंक असून  देशाच्या अर्थव्यवस्थेतील अडसर आहे. कुटुंबाच्या दारिद्र्याचा भाग मुलांच्या वाट्याला येऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूर होतात. या अनिष्ट प्रथेला समाजातून दूर करण्याची नागरिकांची सामुहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अप्पर आयुक्त विजयकांत पानबुडे यांनी केले.
            याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे हे  प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त मा.पे.मडावी, दिनेश ठाकरे, तुळसानंद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे महासचिव डी.ए. गोळे व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
            बालकामगारांच्या अनिष्ट प्रथेमुळे बालकांचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास खुंटतो. या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी कामगार मुंबई यांच्या वतीने दिनांक 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानाची सुरुवात नुकतीच स्वाक्षरी मोहिमेने करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक येथे अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे यांनी बोर्डवर स्वाक्षरी करुन केले.
*****

No comments:

Post a Comment