मुंबई, दि. 19 : ग्राहक संरक्षण कायदा,
1986 नुसार जागो ग्राहक जागो या मोहिमेअंतर्गत संबंधित अधिकारी,
कर्मचारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना प्रशिक्षण
देण्याबाबत तसेच ग्राहक चळवळीच्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती मिळणेसाठी व
अत्याधुनिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले आहे.
हे प्रशिक्षण दि.20 नोव्हेंबर 2019
रोजी सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज, 3 रा मजला, बी रोड, लॉ कॉलेजच्या
मागे, चर्चगेट, मुंबई येथे सकाळी 9.00 ते सायं 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आले
आहे.
या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये
ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार राज्य जिल्हा ग्राहक मंचाचे कामकाज,
न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये ग्राहकांना
येणाऱ्या अडचणींचे निराकरण, रेरा कायदा इ. अन्न सुरक्षा कायदा, ई पॉस मशिनबाबत
माहिती, थेट विक्री करणाऱ्या कंपनीचे कामकाज त्यांच्याविरुद्ध येणाऱ्या तक्रारींचे
निराकरण याबाबत माहिती तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य व यंत्रणेचे
संगणकीकरण ई.ची माहिती तसेच वस्तु व सेवा खरेदीमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक व
त्याचे निराकरण, ग्राहकांचे विविध हक्क उदा.सुरक्षिततेचा हक्क, निवडीचा हक्क,
तक्रार निवारण, माहिती मिळविण्याचा हक्क इ. तसेच शेतकरी, प्रवासी,वीज ग्राहकांच्या
तक्रारी, त्यांचे निवारण व उपाय इत्यादी विषयांवर संबंधित क्षेत्रातील अधिकारी,
मान्यवरांमार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान देण्यात येणार आहेत.
००००
No comments:
Post a Comment