Tuesday, 19 November 2019

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन



          मुंबई, दि. 19 : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
   यावेळी वने विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, मुख्य सचिव कार्यालयाचे  सहसचिव राजेश निवतकर, उपसचिव ज. जी. वळवी यांनी देखील माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
      राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून यावेळी, देशाचे स्वातंत्र आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची व कधीही हिंसाचार अवलंबणार नाही. तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


000



No comments:

Post a Comment