नागपूर, दि. 27: राज्यपाल
भगत सिंह कोश्यारी यांचे आज मुंबईहून विमानाने दुपारी 1.20 वाजता आगमन झाले.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
विमानतळावर
राज्यपालांचे पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला,
राजभवनचे रमेश येवले, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक हेमराज बागूल आदी
अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
विमानतळावरील
स्वागताचा स्वीकार करून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजभवनकडे रवाना झाले.
राज्यपाल आज रात्री मुंबईकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment