मुंबई,
दि. २७ : कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण संचालनालयास भेट देऊन या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध
योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे राज्यातील विविध
ठिकाणच्या ‘आयटीआय’ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्नही समजून घेतले. या
विभागाचे अधिक सक्षमीकरण करुन तरुणांच्या कौशल्याचा विकास करणे आणि त्याद्वारे
राज्यातील बेरोजगारी दूर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
संचालनालयाच्या कार्यालयास श्री. मलिक यांनी भेट
दिली. यावेळी संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकासविषयक विविध
योजनांचे सादरीकरण करण्यात आले. संचालक दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह
संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
संचालनालयामार्फत राज्यात ४१७ शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कार्यरत आहेत. याशिवाय उद्योगांमार्फत चालविल्या
जाणाऱ्या ॲप्रेंटिसशीप कोर्सेसचे संनियंत्रण संचालनालयामार्फत केले जाते. या विविध
योजनांचा श्री. मलिक यांनीआढावा घेतला.
राज्यातील सुमारे १०० आयटीआय आता व्हर्च्युअल
क्लासरुमद्वारे जोडण्यात येत आहेत. काही ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
श्री. मलिक यांनी या यंत्रणेद्वारे काही ‘आयटीआय’मधील विद्यार्थ्यांशी संवाद
साधला. यावेळी औंध, सांगली
आणि गडचिरोली येथील ‘आयटीआय’मधील मुलांशी संवाद साधण्यात आला.
०००००
Iti 2009 completed but not job any 😏
ReplyDelete