नवी दिल्ली, 27 : पुणे
जिल्ह्यातील नारायणगांवचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे
अध्यक्ष विशाल दिलीप भुजबळ यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे
यांच्या हस्ते 'राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.
येथील
वाय.एम.सी.ए. सभागृहात दिल्लीस्थित राष्ट्रीय युथ फेडरेशनच्यावतीने आयोजित
कार्यक्रमात 'राष्ट्रीय युथ आयकॉन
पुरस्कार-2020' चे 25 जानेवारी 2020 ला वितरण करण्यात आले.
विशाल भुजबळ हे मागील 10 वर्षांपासून सामजिक क्षेत्रात पुर्णवेळ कार्यरत आहेत. विविध
सामाजिक उपक्रमात त्यांचा पुढाकार राहिला असून त्यांच्या कार्यामुळे ‘समाज दूत’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी शिक्षण,सहकार,कृषी व सामाजिक क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण कार्याची दखल घेवूनच
त्यांना राष्ट्रीय युथ फेडरेशनने ‘राष्ट्रीय युथ आयकॉन पुरस्कार 2020' पुरस्कराने सन्मानित
केले आहे.
००००
No comments:
Post a Comment