डॉ.हॅनिमन
जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई दि.28: गेल्या काही वर्षांत होमिओपॅथी औषधप्रणालीचा जगभर
प्रसार होत आहे. युरोप, अमेरिका, आखाती देशांसह प्रगत देशांत
होमिओपॅथीकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. राज्यात आज होमिओपॅथीची 54
महाविद्यालये असून ती खासगी आहेत. येणाऱ्या काळात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय
सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
यांनी सांगितले.
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी यांच्या वतीने देण्यात येणारे डॉ.हॅनिमन
जीवनगौरव पुरस्काराचे वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते
करण्यात आले. विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य प्रसाद लाड,
असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथी मेडीकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्रचे सचिव
पृथ्वीराज पाटींल, आदी उपस्थित होते.
होमिओपॅथीचे फक्त इफेक्टस, नो साईड इफेक्टस
श्री. देशमुख म्हणाले की, कोणताही आजार असलेल्या रुग्णाला
त्याचा आजार बरा होणे नाही याबरोबरच तो आजार समूळ नाहीसा होणे आवश्यक असते.आजाराचे
मूळ शोधून त्यावर परिणामकारक उपचार हे होमिओपॅथीचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच
होमिओपॅथीचे फक्त इफेक्टस आहेत साईड इफेक्टस नाहीत. होमिओपॅथीमध्ये अनेक दुर्धर
आजार बरे करण्याची शक्ती आहे हे सिद्ध झाले आहे. होमिओपॅथीवर विश्वास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
होमिओपॅथीमध्ये संशोधन होणे आवश्यक
आज महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत जेथे होमिओपॅथी डॉक्टर
पोहोचले असून सेवाभावाने रुग्णांची सेवा करीत आहे. होमिओपॅथीची जपणूक होणेही
आवश्यक आहे. आज होमिओपॅथीचा अभ्यास अनेक विद्यार्थी करतात. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना
या अभ्यासक्रमातून काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार
असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाला कळवाव्यात. विद्यार्थ्यांनी
होमिओपॅथीमध्ये संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे. याचा रुग्णांना आणि या
क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल. त्यादृष्टीने डॉक्टरांनी प्रयत्न करावे, असे
श्री. देशमुख यावेळी म्हणाले.
होमिओपॅथीमध्ये सेवा देणाऱ्यांचा सन्मान करणार
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आगामी काळात होमिओपॅथीमध्ये
उत्कृष्ट सेवा देणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. होमिओपॅथी विद्यार्थी, प्राचार्य,
डॉक्टर, संशोधक यांचा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी गौरव करण्यात येईल.
होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवा मिळण्याबाबतच्या मुद्याबाबत सकारात्मक विचार
करण्यात येईल असेही श्री. देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
तीन डॉक्टरांना मरणोत्तर विशेष पुरस्कर
औरंगाबादचे कै. डॉ. शांतीलाल मोतीलाल देसरडा, ठाण्याचे कै. डॉ. मिलिंद वासुदेव
राव आणि परभणीचे कै. डॉ. संदीप सोनापंत नरवाडकर यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार देण्यात
आला. हे पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी स्वीकारले.
आठ वर्षातील पुरस्कार प्रदान
या कार्यक्रमात सन 2012 ते सन 2020 पर्यंत असे एकूण आठ वर्षातील पुरस्कार
प्रदान करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते 24
डॉक्टरांना यावेळी डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ.
हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार मिळविलेल्या डॉक्टरांची नावे पुढीलप्रमाणे :
सन 2012-2013
डॉ.
गोविंदराजन शंकरन, मुंबई
डॉ.
विलास गजानन डांगरे, नागपूर
डॉ.
राजेंद्र अरविंद श्रीमाळी, कोपरगांव
सन 2013-2014
डॉ.
राजेंद्र शिवचंद सबद्रा, नाशिक
डॉ.
विद्यासागर लक्ष्मणराव उमळकर, मुंबई
डॉ.
अशोक लक्ष्मणराव वनमाळी, गडचिरोली
सन 2014-2015
डॉ.
रमेश लखीचंद जैन, धुळे
डॉ.संजीव
मनोहर डोळे, पुणे.
डॉ.सुनिल
भास्कर आठवले, देवगड
सन 2015-2016
डॉ.
गोविंद प्रतापराव तितर, मुंबई
डॉ.
यशवंत विठ्ठलराव खोब्रागडे, नागपूर
डॉ.
प्रशांत गोवर्धन शेठ, वाशी, मुंबई
सन 2016-2017
डॉ.
अमरसिंह दत्ताराम निकम, पुणे
डॉ.बापुराव
विश्वनाथराव धाकुलकर, नागपूर
डॉ.
प्रमोदिनी प्रकाश पागे, मुंबई
सन 2017-2018
डॉ.
विलास सिमरतलाल वोरा, औरंगाबाद
डॉ.
कुमार मित्रचंद्र ढवळे, पालघर
डॉ.
रोझारिओ पास्कल डिसोझा, आजरा
सन 2018-19
डॉ.
रामगोपाल धनराज तापडीया, अमरावती
डॉ.(श्रीमती) कांचन
शांतीलाल देसरडा, औरंगाबाद
डॉ.
किशोर ओंकारराव मालोकर, अकोला
सन 2019-2020
डॉ.
फारुख फकरुद्दीन मोतीवाला, नाशिक
डॉ.
रवीकुमार गजानन जाधव, कोल्हापूर
डॉ. अमय
शामकांत तळवलकर, पुणे
0000
No comments:
Post a Comment