Friday, 13 March 2020

शासकीय सुटीच्या दिवशी परिवहन कार्यालय सुरु

        नागपूर, दि. 13: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे नवीन वाहनांना क्रमांक मिळवून जनतेला  वाहनाचा ताबा देणे, महसूल वसुलीची  उद्दिष्ट पूर्तता करणे यासाठी दिनांक 21, 22, 25, 28, 29 मार्च 2020 या शासकीय सुट्यांच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (ग्रामीण) सुरु राहणार आहे.
            सर्व संबंधित वाहनधारकांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण)यांनी कळविले आहे.
                                                      ****** 

No comments:

Post a Comment