नागपूर, दि. 17 : कोरोना विषाणूच्या
वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत अंत्योदय
शिधापत्रिकांधारकाना शिधावस्तूंचे मोफत किट सर्व दुकानात मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.तरी या
कार्डधारकांनी त्यांचे किट संबंधित रास्तभाव दुकानातून प्राप्त करून घेण्याचे
आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोरोना संसर्गामुळे पॉस (POS) मशीनद्वारे
अंगठा लावण्याची गरज नाही.मागील देान तीन महिन्यात धान्याची उचल केली नसेल त्यांना पुन्हा
रिॲक्टीव्हेट करण्याची गरज नाही.केशरी
कार्डधारकांनी आधार सिंडीग केले नसल्यास सध्या करण्यासची गरज नाही .त्यांना
मे व जुन मध्ये ऑफलाईन धान्य वितरण होणार
आहे.त्यांनी रास्तभाव दुकानातून धान्याची उचल करावी .
नागपूरबाहेरील
राज्यातील रहिवासी जर लॉकडाऊनमध्ये अडकले असतील त्यांना पोर्टेबिलिटीद्वारे
जवळच्या दुकानातून धान्य साठा प्राप्त होवू शकतो. तथापि त्यांची शिधापत्रिका जरी
या वेळी उपलब्ध नसली तरी शिधापत्रिका आरसीयाडी किंवा आधार क्रमांक असल्यास धान्य
साठी प्राप्त होईल. मात्र मूळ गावातून धान्याची उचल झाली असल्यास पुन्हा धान्य
साठा उपलब्ध् होणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment