नागपूर, दि. 17 : लॉकडाऊन सुरु असतांना अडचणीच्या काळात कोणालाही
आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी सर्व बँकांनी त्यांच्या सर्व शाखा
नियमित सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी
रविंद्र ठाकरे यांनी नुकतीच सर्व बँकांच्या प्रतिनिधीसोबत आढावा बैठक घेतली.
त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या सर्व शाखा नियमित वेळेत सकाळी
10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात. ग्राहकांसाठी बँकेची वेळ सकाळी 10 ते
सायंकाळी 4 वाजेपर्यंत राहील. बँकांनी सर्व शाखांमध्ये सोशल डिस्टन्सींग कटाक्षाने
पाळले जाईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच बँकेत येणाऱ्या ग्राहकांना हात धुण्यासाठी
साबण वा सॅनिटायजर आणि मुबलक पाणी ठेवणे बंधनकारक आहे.
केंद्र
शासनाच्या आदेशानुसार महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी 500 रुपये जमा
होण्यास सुरुवात झाली असून, हे सानुग्रह अनुदान एप्रिल, मे आणि जून महिन्यात जमा
होणार आहे. त्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे
पैसे सद्यास्थितीत जमा झाले आहेत. त्यामुळे गर्दी करु नये. म्हणून बँकांच्या सर्व
शाखांमध्ये ग्राहकांनी सोशल डिस्टन्सींग पाळण्यासाठी चार-चार फुटांचे वर्तुळ बनवून
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढणार नाही, याची काळजी बँक प्रशासनाने घ्यावी. तसेच
बँकेच्या दर्शनी भागात कोरोनाच्या जनजागृती आणि उपाययोजनांसंदर्भात होर्डिंग
लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी दिल्यात.
****
No comments:
Post a Comment