Thursday, 18 June 2020

सामाजिक न्याय विभागाकडून मुख्यमंत्री निधीस 9 लाखांची मदत



        नागपूर, दि. 18 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय राजपत्रित अधिकारी संघटना तसेच समाज कल्याण कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 9 लाख 8 हजार 597 रुपयांचा धनादेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आज सूपुर्द करण्यात आला. श्री. पटोले यांनी या मदतीबद्दल सामाजिक न्याय विभागाचे अभिनंदन केले.
सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र भुजाडे ,सदस्य प्रफुल्ल गोहते, नागपूर विभागीय अध्यक्ष स्नेहल शंभरकर, सदस्य मंगेश वानखेडे, बाबासाहेब देशमुख, आशा कवाडे, आर. डी. आत्राम, सुकेशिनी तेलगोटे  आदी यावेळी उपस्थित होते.  

****** 

No comments:

Post a Comment