Thursday, 18 June 2020

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले






 वनप्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश

        नागपूर, दि. 18: धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 प्रकल्पासाठी लागणारा 85 कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करुन देण्यात येईल. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करावे अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जलसंपदा विभागाला दिल्या. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा येथील मुख्यमंत्री सचिवालयात येथे घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
            गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता ज. द. टाले, गोसेखुर्द प्रकल्प मंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंता अंकुश देसाई,  पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत बोरकर, धापेवाडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाळके, नेरला उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल फरकडे, डावा कालवा विभाग कार्यकारी अभियंता सुहास मोरे व पाटपबंधारे प्रकल्प अन्वेषण विभागाच्या कार्यकारी अभियंता अनिता पराते यावेळी उपस्थित होते.
धापेवाडा उपसा सिंचन योजना
            धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 प्रकल्पासाठी 85 कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करुन देण्यात येईल. इतका निधी उपलब्ध झाल्यानंतर पाईपलाईन्सची  कामे पूर्ण होऊन बोदलकसा व चोरकमारा तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची कामे वेगाने  पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या. तसेच पुढील कामांसाठी 35 हेक्टर वन जमिनीची आवश्यकता असल्यामुळे वन प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
गोसीखुर्द डावा कालवा
            गोसीखुर्द डावा कालव्यांतर्गत पवनी व लाखांदूर तालुक्यातील उर्वरित सुमारे 8000 हेक्टर सिंचनक्षमता निर्माण करण्यासाठी नवीन निविदा काढणे आवश्यक असल्याने त्यासाठी पुढील आठवड्यामध्ये मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. तसेच गोसीखुर्द धरणाच्या पायथ्यालगत असणाऱ्या कुर्झा, वासेळा गावांना लवकरात लवकर सिंचन  सुविधा देण्यासाठी गोसी उपसा सचिंन योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
नेरला उपसा सिंचन योजना
            नेरला उपसा सिंचन योजनेची सिंचनक्षमता 23 हजार 447 असून सद्य:स्थितीत 10 हजार 612 हेक्टर सिंचनक्षमता निर्मित झाली आहे. उर्वरित सिंचन क्षमता निर्माण करण्याकरिता बंद नलिका वितरण प्रणालीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या.
धारगाव उपसा सिंचन योजना
        प्रस्तावित धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा-1 व टप्पा-2 अंतर्गत भंडारा तालुक्यातील 31 लाखनी-19 व साकोली-21 अशा 71 गावांतील 11 हजार 700 हेक्टर क्षत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे. टप्पा-1 अंतर्गत सर्वेक्षण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरच तयार करण्यात येईल. तर टप्पा-2 चे सविस्तर प्रकल्प अहवालाकरिता सर्वेक्षण व इतर कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे निर्देश श्री. पटोले यांनी दिले.
****

No comments:

Post a Comment