नागपूर, दि. 15: कोविड-19 विषाणूशी लढा
देण्यासाठी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमने सात लाखाचा
धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपूर्द
केला. ऑफिसर्स फोरमने सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून हे कार्य केले आहे. विभागीय
आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, ऑफिसर्स
फोरमचे पदाधिकारी शिवदास वासे, सचिव टी. बी.
देवतळे, उपाध्यक्ष विलास सुटे, कोषाध्यक्ष अशोक गेडाम, उपजिल्हाधिकारी सच्चिदानंद
दारुंडे, प्राचार्य धर्मेश फुसाटे व उपविभागीय अधिकारी ललीत खोब्रागडे
प्रामुख्याने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment