Wednesday, 17 June 2020

सवलतीच्या गुणवाढीचे प्रस्ताव शनिवारपर्यंत सादर करा

                          

        नागपूर, दि.17माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परिक्षेस  सन 2019-20 मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास  दिनांक 20 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने उद्1भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक खेळाडू विद्यार्थ्यांचे गुण प्रस्ताव तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विहित मुदतीत सादर होऊ शकले नाही.
            तथापी संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विहित नमुन्यात  शनिवार दिनांक 20 जून 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करावे, तसेच संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन दिनांक 25 जून पर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशीसह सादर करावेत. निकाल वेळेवर लावण्याच्या दृष्टीने ही अंतिम मुदतवाढीची सवलत सन 2019-20 या एका शैक्षणिक वर्षाकरिता लागू असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
       तरी मार्च 2020 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस प्रविष्ठ सर्व खेळाडू, एन.सी.सी., स्काऊट गाईड यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी कार्यवाही करण्याचे आवाहन नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.    
***** 

No comments:

Post a Comment