Wednesday 18 October 2023

‘गडकरी’ चित्रपटामुळे नव्या पिढीसमोर गडकरींचे वैविध्यपूर्ण व्यक्तीमत्व उलगडेल - उपमुख्यमंत्री फडणवीस  गडकरींवरील बायोपीकच्या टिझरचे प्रकाशन

नागपूर, दि. 17 : नितीन गडकरी यांच्या बहुविध क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना देशाने स्विकारले आहे. गडकरी हे इन्होवेटर असून संपूर्ण जगात पायाभूत सुविधासह रस्ते विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना रोडकरी म्हणूनही ओळखले जाते. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा या क्षेत्रात राबविलेल्या अनेक अभिनव कल्पनांमुळे त्यांना संपूर्ण देशाने स्विकारले आहे. ‘गडकरी’ या चित्रपटामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोहचतील तसेच त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा मिळेल. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या बायोपिकच्या टिझरचे प्रकाशन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार दत्ता मेघे, आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, विकास कुंभारे, भारतीय क्रिकेट संघातील आघाडिचा गोलंदाज उमेश यादव तसेच चित्रपटाचे निर्माते अभिजीत मुजुमदार उपस्थित होते. नितीन गडकरी यांच्यावरील बायोपीकचे प्रकाशन प्रसंगी मुख्य भूमिकेत असलेले राहुल चोप्रा व चित्रपटातील सहकलाकार आदींची उपस्थिती लक्षवेधक ठरली. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिपप्रज्वलीत करुन टिझरचे प्रकाशन केले. हा चित्रपट दिनांक 27 ऑक्टोंबर पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शीत होणार आहे. गडकरी यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे तीन तासात दाखविण्याचे कठीण काम या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी लिलया पार पाडले आहे. चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर त्यांच्या कार्याच्या आढावा घेणारा गडकरी-2 हा चित्रपट सुद्धा प्रदर्शीत करण्याची जबाबदारी दिग्दर्शकावर राहणार आहे असे मत श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले. गडकरींमधील कामाचा झपाटा आणि ते पूर्ण करण्यासाठी असलेली क्षमता प्रत्येकाने आत्मसाद करावी असे सांगतांना श्री. फडणवीस म्हणाले की, गडकरी हे प्रसिद्ध अभिनेता राज कपूर सारखे आहेत. ते छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण करतात आणि त्याशिवाय थांबत नाहीत. मुंबई-पुणे एक्प्रेस हायवे पूर्ण करण्याचे त्यांचे कार्य जगा समोर आदर्श म्हणून बघितले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत असतांनाच पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा रोड मॅप तयार करण्याची जबाबदारी श्री. गडकरी यांच्यावर सोपविल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रसिद्ध क्रिकेटपटू उमेश यादव यांनी जगात फिरतांना रस्त्याचे महत्व लक्षात येते याच पद्धतीने देशातील रस्ते तयार करण्याचे काम श्री. गडकरी यांनी केले आहे. नागपुरातील विकासा संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, मेट्रो रेल्वेचा डबल डेक्कर पूल हा बांधकाम क्षेत्रातील महिलाचा दगड ठरला असून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी या कामाचे विशेष कौतुक केल्याचे उमेश यादव यांनी अधोरेखित केले. यावेळी आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे यांनी श्री गडकरी यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू आपल्या भाषणातून उलगडले. गडकरी या चित्रपटाचे निर्माते अभिजीत मुजुमदार निर्मिती प्रमुख अक्षय देशमुख तसेच अनुराग भुसारी, मिहीर फाटे, अक्षय पाटील यांनी स्वागत केले. 00000

No comments:

Post a Comment