Thursday, 14 August 2025

देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षण रविभवन येथे 14 ऑगस्ट पर्यंत कार्यशाळा

 

 

ऑगस्ट पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात

नागपूर, दि.13 : देशांतर्गत पर्यंटन खर्च सर्वेक्षणाच्या माध्यमातून टूरिझम सॅटेलाईट अकाऊंट तयार करण्यात येत असून अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय नमुना पहाणी अंतर्गत माहिती संकलित करण्यात येणार आहे. पर्यटनासंदर्भात नमुना पहाणी 80 वी फेरी अंतर्गत रविभवन येथे दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षण यातंर्गत देशातील व विदेशातील पर्यटना संदर्भात माहिती संकलित करण्यात येत आहे. हे भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्रमवारित सुधारणा करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. देशांतर्गत पर्यटन सर्वेक्षण विभागात ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या नमुना पहाणीसाठी येणाऱ्या प्रगणकाला पर्यटना संदर्भात माहिती उपलब्ध करुन दयावी असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक श्रीमती बुलकुंडे यांनी केले आहे.

पर्यटन क्षेत्र हे परिवहन, निवास, अन्न व पेय सेवा, मनोरंजन आणि करमणूक या सारख्या अनेक पारंपारिक उद्योगांचे एकत्रीकरण आहे. देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षणा अंतर्गत प्रवासांसह त्यावर होणाऱ्या खर्चाची माहिती गोळा करण्यासाठी आखले गेले आहे. यासोबतच कुटूंबांच्या वैशिष्ट्यांची, प्रवाशांच्या आणि प्रवासांच्या वैशिष्ट्यांची माहिती संकलित केली जाईल. देशांतर्गत पर्यटन खर्च सर्वेक्षणात रात्रीसह प्रवासाच्या खर्चासंबंधीच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेली माहिती ही टुरिझम सॅटेलाइट अकाऊंट तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. ही माहिती टूरिझम सॅटेलाईट अकाऊंट तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे. यापूर्वीही  सर्वेक्षण घेण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या मंत्रालयाची ही जबाबदारी आहे. प्रवास व पर्यटनाचा जीडीपी मध्ये वाटा दर्शवितो. ज्याच्या आधारावर दोन वर्षानी एकदा टॅव्हल ॲन्ड टूरिझम डेव्हलेपमेंट निर्देशांक प्रकाशित केला जातो. हा निर्देशांक देशातील पर्यटन आणि प्रवास क्षेत्र किती सुधारणा करायला सुचविण्यासाठी सहाय्यभूत ठरत आहे.  

प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन हे प्रादेशिक उपसंचालक श्रीमती प्रणोती बुलकुंडे यांच्याहस्ते झाले. यावेळी सांख्यिकी अधिकारी श्रीमती पल्लवी नाईक, सहायक संशोधन अधिकारी भिवाजी राणे उपस्थित होते.

सहायक संशोधन अधिकारी भिवाजी राणे यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना माहिती दिली.

प्रास्ताविक श्रीमती प.सं. नाईक यांनी सुत्रसंचालन श्रीमती सरिता वंजारी यांनी केले. यावेळी प्र.व.पाटील, ज्ञा.बा.खडतकर, सु.को.वंजारी, श्रीमती माधुरी नासरे, सांख्यिकी अधिकारी, अनिल गो. नन्नेवार आदी उपस्थित होते.

00000


No comments:

Post a Comment