महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण
नागपूर, दि.14 : भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन आज 15 ऑगस्ट 2025 रोजी सर्वत्र साजरा होत असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या
मुख्यालय स्थळी सकाळी 9.05 वाजता मंत्री, पालकमंत्री, सहपालकमंत्री यांच्याहस्ते मुख्य
शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नागपुरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ महसूल मंत्री
तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात
होणार आहे.
चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार
आहे. भंडारा येथील पोलीस कवायत मैदानावर वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते तर गोंदिया येथील पोलीस मुख्यालयाच्या
मैदानावर कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते
ध्वजारोहण होणार आहे.
गडचिरोली
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री
ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते तर वर्धा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
00000
No comments:
Post a Comment