विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात
मुख्य शासकीय समारंभ
भारताच्या
79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर महसूल मंत्री श्री. बावणकुळे सशस्त्र
पोलीस दलाची मानवंदना स्विकारतील. त्यानंतर जनतेला उद्देशून संबोधित करतील. मुख्य शासकीय
समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
स्वातंत्र्य
दिनानिमित्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शंभर दिवस या उपक्रमातंर्गत उत्कृष्ट
कार्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून पालकमंत्री यांच्याहस्ते गौरव
करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तसेच विभागीयस्तरावरील राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर विविध
योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कार्याबद्दल विविध विभाग तसेच संस्था व व्यक्तिंचा
यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम
भारताच्या
79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सायंकाळी 5.30 वाजता सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल
व ज्युनिअर कॉलेज येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक
कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले
आहे.
00000

No comments:
Post a Comment