Saturday, 2 August 2025

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन


नागपूर, दि. 2 : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शंकर नगर येथील निवास्थानी भेट देऊन दिव्याचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. देशमुख कुटुंब आणि गवई परिवाराचे तीन पिढ्यापासून कौटुंबिक संबंध असल्यामुळे दिव्याचा विश्वविजय आमच्या साठी कौटुंबिक आनंद साजरा करणारा क्षण आहे,  असे यावेळी न्या. भूषण गवई यांनी सांगितले.

यावेळी दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख, आई डॉ. नम्रता देशमुख आदी उपस्थित होते. कु. दिव्या देशमुख हिने स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत पहिली भारतीय महिला बुद्धिबळ विश्वविजेती होण्याचा मान पटकावला आहे. तिचे आजोबा डॉ. के. जी. देशमुख हे अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते. ज्ञान, बुद्धिमत्ता आणि चिकाटी यांच्या जोरावरच दिव्याने संपूर्ण देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.गौर्वोदगार यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शुभेच्छा देतांना व्यक्त केले.

 

00000


No comments:

Post a Comment