नागपूर, दि. २: मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला
अभिवादन केले. यावेळी त्यांनी आयोजित बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.
सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले की, ड्रॅगन पॅलेस टेंपल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले
आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे
येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपूरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेंपलला
भेट द्यायची इच्छा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
00000
No comments:
Post a Comment