Sunday, 24 July 2016

व्यंगचित्र हे समाज मनाचा आरसा -आमदार सुनिल केदार


रंगायत कलादालन चिटणवीस सेंटर येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  यांना समर्पित व्यंगचित्र प्रदर्शनी कार्यशाळचे उद्घाटन आ. सुनिल केदार यांच्या हस्ते  फित कापून झाले.  यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आ. दिनानाथ पडोळे, दै.भास्कर समूहाचे संपादक प्रकाश दुबे, विलास काळे, व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजक शशिकांत सप्रे, राजीव गायकवाड, विनय चाणेकर उपस्थित होते.
 यावेळी आ. सुनिल केदार म्हणाले की, समाजात राजकीय व सामाजिक नवनवीन घडणाऱ्या घडामोडींचे दर्शन व्यंगचित्रकार कुचलयांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो. असे व्यंगचित्रकार समाजापासून दुर्लक्षित असून अशा व्यंगचित्रकारांना समाजाने पुढे येऊन मदत करावी.  यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहू असेही, त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दैनिक भास्करचे समूह संपादक  प्रकाश दुबे म्हणाले की, व्यंगचित्रकार हा साधक असतो. तो समाज मनाचा विचार करुन व्यंगचित्र काढतो, त्याच्या व्यंगचित्राने सामाजिक, राजकीय जीवनावर निश्चित परिणाम होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी आ. दिनानाथ पडोळे म्हणाले की, व्यंगचित्रकार हा चौकस असला पाहिजे. समाजात घडणाऱ्या परिवर्तनाची त्याला चाहूल लागली पाहिजे.  साहित्याची गोडी असलेला व्यंगचित्रकार व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजाला विचार करायला लावतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, चारुहास पंडित, घनशाम देशमुख, विष्णू आकुलवार, शशिकांत सप्रे, राजीव गायकवाड, विनय चाणेकर, रविंद्र बाळापुरे, संजय मोरे, उमेश चारोळ, प्रभाकर दिघेवार, अशोक बुलबुले, गजानन घोंगडे, सतिश उपाध्याय, निलेश कानकिरड, पीयुष जोशी, सुरेश राऊत, गणेश बोबडे, गजानन वानखेडे, सुधीर ठोकळ(दिवंगत) इरफान, मनोहर सप्रे, जयवंत काकडे, श्रीकांत कोरान्न, गणेश वानखेडे यांचे व्यंगचित्र लावण्यात आले होते.

*****

No comments:

Post a Comment