नागपूर, दि. 23 : बालकांच्या न्याय हक्कासाठी कायद्याची व्याप्ती वाढविण्याबरोबर
समाजाच्या प्रत्येक घरा घरात संस्कारक्षम शिक्षण देणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे
उपप्रबंधक आशिष आवारी यांनी आज केले.
उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती व
जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय मुलींचे बालगृह काटोल रोड, नागपूर येथे
बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आशिष आवारी यांच्याहस्ते दिप प्रज्वलन
करुन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी श्रीमती एस.जे. कोल्हे, श्रीमती सुवर्णा दामले, ॲङ सुरेखा बोरकुटे,
श्रीमती निंबाळकर आदी उपस्थित होत्या.
यावेळी आशिष आवारी म्हणाले की,
दैनंदिन जीवन जगताना समाजात महिला व मुलींवर अत्याचार होतांना आपण वृत्तपत्रातून वाचतो. याला समाजही जबाबदार आहे. समाजानेही आपल्या
मुलामुलींना संस्कारक्षम शिक्षण देवून चांगल्या वाईटची जाणीव करुन दिली पाहिजे.
लहान वयातच चांगले शिक्षण मिळाले तर ते भविष्यात वाईट मार्गाला लागणार नाहीत.
यासाठी सामाजाची मानसिकता बदलने गरजेचे
आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ॲङ सुरेखा बोरकुटे यांनी
बालकांच्या समस्या व उपाय, ॲङ सोनाली सावरे यांनी बालकांचे हक्क आणि कर्तव्य
याविषयावर उपस्थित मुलींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुजाता
देशमुख केले तर आभार संरक्षण अधिकारी बोंडे यांनी मांडले.
0000
No comments:
Post a Comment