नागपूर, दि. 9 : जोसेफ राव हे एक प्रामाणिक पत्रकार म्हणून पत्रकारिता क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. गेल्या तीस वर्षांत त्यांनी संतुलित पत्रकारिता केली. त्यांचे आणि माझे पत्रकाराव्यतिरिक्त मैत्रीपूर्ण संबंध आहेत. विविध भेटीमध्ये विविध विकासात्मक व सामाजिक विषयांवर चर्चा होतात. नवीन पत्रकारांनी त्यांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे ब्यूरो मॅनेजर जोसेफ राव यांचा आज टिळक पत्रकार भवनातील सभागृहात षष्ठब्दीपूर्ती समारंभ नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभात महापौर प्रवीण दटके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार प्रामुख्याने उपस्थित होते.
जोसेफ राव व यांच्या पत्नी जेनेट मेरी यांचा नितीन गडकरी यांनी शाल श्रीफळ व मानपत्र देवून सत्कार केला. मानपत्राचे वाचन एस. एन. विनोद यांनी केले.
नागपुरातील पत्रकारांनी देशभरातील वृत्तपत्रांमध्ये लिखाण व काम करुन उल्लेखनीय यश मिळविले आहे. अगदी उमेदीच्या काळापासून जोसेफ राव यांचेशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. 1980 च्या काळात जोसेफ राव नागपूर टाईम्समध्ये असतांना त्यांचा माझा संबंध आला. हे संबंध व मैत्री कायम आहे. त्यांच्यात एक विधायक दृष्टी असून समाजासाठी काहीतरी करावे अशा भावनेने ते भारावलेले असतात. असेही नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
माजी खासदार बनवारीलाल पुरोहित आपल्या भाषणात जोसेफ राव यांचेविषयी बोलतांना म्हणाले की, पत्रकारितेच्या उच्च आचरणाचे पालन जोसेफ राव नेहमी करतात. अनुभवी, निष्णात व सभ्य पत्रकार म्हणून त्यांचा नागपुरातील पत्रकारितेत लौकिक आहे. हल्ली पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत आहे. नव-नवे तरुण या क्षेत्रात येत आहेत. अशा तरुणांनी पीत व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणारे पत्रकार म्हणून काम करावे, असे आवाहनही पुरोहित यांनी आपल्या भाषणात केले.
माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात पीटीआय सारख्या बातम्यांसाठी विश्वसनीय संस्थेत काम केले. पीटीआयच्या बातम्या म्हणजे विश्वासार्हता, वृत्तपत्र आणि वाहिन्यांमध्ये पीटीआय या संस्थेचा उल्लेख होतो. अशा या संस्थेत जोसेफ राव यांनी काम करुन त्या संस्थेचा लौकिक वाढविला.
जोसेफ राव
जोसेफ राव सत्काराला उत्तर देतांना भावूक झाले होते. पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रवेश केला. एका बलिदान या नावाच्या छोट्या वृत्तपत्रात पत्रकारितेला सुरुवात केली. घरामध्ये पत्रकाराची परंपरा नसतानाही या क्षेत्राकडे वळण्याचे मी धाडस केले. हितवाद, नागपूर टाईम्स आणि आता पीटीआय असा माझा तीस वर्षांचा पत्रकारितेतील प्रवास आहे. असुरक्षित क्षेत्र म्हणून पत्रकारिता जगताकडे पाहिल्या जाते. परंतु मी माझ्या कामाप्रती एकनिष्ठ राहून काम केले. हिन्दी माध्यमात माझे शिक्षण झाले. परंतु पत्रकारिता मी इंग्रजी भाषेत केली. अत्यंत संतुलित पत्रकारिता करण्याकडे माझा नेहमीच कल राहिला आहे. चारित्र्य हनन आणि इतर बाबींच्या बातम्यांकडे मी कधीही लक्ष दिले नाही. समाजातील विविध स्तरातील कार्यकर्त्यांसोबत माझा संपर्क आला. याचा फायदा मला पत्रकारिता करतांना निश्चिपणे झाला. आतापर्यंतच्या माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात माझी पत्नी जेनेट मेरी व माझ्या कुटुंबियांची सोबत लाभली. सोबतच मी माझ्या आरोग्याला जपण्यासाठी एक शिस्त लावली. त्यामुळे अजूनही मी या क्षेत्रात सक्रियपणे काम करीत आहे. असे सांगितले.
यावेळी टाईम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार व षष्ठब्दीपूर्ती सोहळा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल मारपकवार व कार्याध्यक्ष प्रदीप मैत्र यांचेही यावेळी भाषण झाले. विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनीही जोसेफ राव यांचे अभिष्टचिंतन केले.
या समारंभात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गार्गी निमदेव, गौरी मानापुरे, श्रेया चक्रवर्ती, अश्लेषा वैद्य, ललित होले, शुभम या पत्रकारांच्या मुलांचा पुष्पगुच्छ देऊन बनवारीलाल पुरोहित व विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांनी सत्कार केला.
या समारंभास नागपूर कॅथालिक धर्म प्रांतचे आर्च बिशप अब्राहम, विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया, उमेश चौबे, रणजित देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, प्रकाश गजभिये, माजी आमदार दिनानाथ पडोळे, एस. क्यू. जमा, मुंबईचे पीटीआयचे ब्युरो चिफ विलास तोकले, विश्वास पाठक, अभिनंदन थोरात, मेघनाद बोधनकर, गजानन निमदेव, सुधीर पुराणिक, जयप्रकाश गुप्ता, ॲड. मारपकवार, एअर इंडियाच्या स्टेशन मॅनेजर श्रीमती ॲनिस पॉल, तेजंदरसिंग रेणू, प्रफुल्ल गाडगे, डॉ. अविनाश बानाईत, ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सुधीर जाधव, शिरीष बोरकर, एस. पी. सिंग, टी. बी. गोल्हर, जोसेफ राव यांचे चिरंजीव जस्टीन व त्यांचे कुटुंबिय यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एबीपी माझाच्या वरिष्ठ पत्रकार सरिता कौशिक यांनी तर आभार दैनिक हितवादचे शहर संपादक राहुल पांडे
*****


No comments:
Post a Comment