सेवा सुविधा ॲपचे उद्घाटन
नागपूर, दि. 25 : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणार विविध परवाने ऑनलाईन देण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सुविधा ॲप ही ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून या सुविधा सेवेचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालय मुंबई या कार्यालयात ही सुविधा आजपासून सुरु झाली आहे.यावेळी राज्यमंत्री विजय देशमुख, उत्पादन शुल्क आयोग श्रीमती व्ही. राधा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या गतिमान प्रशासन या संकल्पनेअंतर्गत इच्छुक परवाने धारकांना सुविधा व्हावी म्हणून उत्पादन शुल्क विभागाने महाऑनलाईन यांच्या माध्यमातून ऑनलाईन सर्व्हिसेस प्रणाली विकसीत केली आहे. त्यामुळे राज्यातील मद्यविक्रीचे परवाने, धाऊक मद्य विक्री परवाने व वैद्यकीय मद्य सेवन परवाने यासारख्या सेवा आता www.stateexcise.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे.
मद्य विक्रीचे परवाने आणि त्यासाठी लागणारे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून कागदपत्राची तपासणी सुद्धा ऑनलाईन होईल. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असल्यामुळे भ्रष्टाचाराला कुठेही वाव राहणार नाही. अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मद्य विक्रीसाठी देण्यात येणारे परमिट, बियर बार तसेच बियर शॉप यासारखे परवाने ऑनलाईन मिळणार आहे. कुठूनही आता अर्ज भरता येईल किंवा पैसेही भरता येईल. गेल्या 2 ऑक्टोबरला विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अवैध मद्याच्या तक्रारी दाखल करण्यासाठी व्हॉट्स अप क्रमांक व टोल फ्रि कमांकाचे उद्घाटन केले होते. आता या सर्व प्रणालीची सुविधा ॲप असे मोबाईल बेस्ड ॲप तयार केले असून त्यावर दाखल केलेल्या तक्रारी बद्दल तक्रार दारांना माहिती कळविण्यात येणार आहे. google .app store वर एक्साईस कम्प्लेंट या नावाने डाऊनलोड करता येईल ही सुविधा सुद्धा आजपासून सुरु झाली आहे. नागरिकांनी टोल फ्रि क्रमांक 18008333333 तसेच व्हॉट्स ॲप क्रमांक 8422001133 या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संपूर्ण सेवा सुविधा ऑनलाईन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन केले आहे. या सुविधेमुळे सर्व व्यवहार व परवान्याची प्रक्रीया पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटंले आहे.
*****

No comments:
Post a Comment