- मंगळवारी झोनमधील नागरिकांना मिळाला दिलासा
- समाधान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
नागपूर, दि. 25 : विविध विभागाकडे प्रलंबित असलेले प्रश्न तसेच संजय गांधी निराधार योजनेसह आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आखिव पत्रिका आदी प्रमाणपत्र जनतेला मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या माध्यमातून तात्काळ व सुलभपणे मिळत आहेत. समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आल्यामुळे या संधीचा नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुधाकर देशमुख यांनी केले आहेत.
मंगळवारी झोन मधील नागरिकांसाठी शासनाकडून आवश्यक असलेले सर्व प्रमाणपत्र व परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले. सिव्हिल लाईन्स परिसरातील ऑफीर्सस क्लबच्या लॉनवर मुख्यमंत्री समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये वीस प्रकारच्या परवानग्या अकरा विभागाकडून एकाचवेळी देण्याचे व्यवस्था करण्यात आली आहे. समाधान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण यांच्या उपस्थित आमदार प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते झाले.
यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भुषण शिंगणे, नगरसेवक संदिप जाधव, मिनाताई तिडके, साधना भरडे, संगीता गिरे, विशाखा जोशी, सुनिल अग्रवाल, किशन गावंडे, जगदिश वालबंशी, अभय दिक्षित आदींच्या उपस्थितीत झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, अन्न व नागरी पुरवठा विभाग, एमएसईबी व एसएनडीएल, बँक ऑफ इंडिया, ओसीडब्ल्यु आदी विभागाशी संबंधीत असलेले प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था समाधान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या समाधान शिबिरामध्ये मंगळवारी झोनमधील नागरिकांचे समाधान करण्यासाठी विभागनिहाय 20 दालने तसेच आधारकार्ड, विवाह नोंदणी, जन्मनोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा अग्रणी बँकेतर्फे प्रधानमंत्री मुद्रा लोन, विमा योजना,भुमी अभिलेख कार्यालयातर्फ मालमत्तेसंबंधी आखीवपत्रिका देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शपथपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, वय अधिवास, व राष्ट्रीय प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फ या शिबिरामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. पांडे, तहसिलदार श्री.ठाकरे, ऑफीसर क्लबचे व्यवस्थापक आर.टी. नंदागवळी तसेच विविध संस्थाचे प्रतिनिधींनी या शिबिर आयोजनासाठी सहकार्य केले आहे.
*******


No comments:
Post a Comment