Wednesday, 14 December 2016

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विमानतळावर स्वागत


नागपूर, दि. 14 :  राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  विमानतळावर आज सकाळी 11.55 वाजता आगमन झाले. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रपती यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी महापौर प्रवीण दटके, एअर मार्शल पंकज अनेजा, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलिस आयुक्त डॉ.  के. व्यंकटेशन, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनीही राष्ट्रपतींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विमानतळावरील स्वागताचा स्विकार करून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भारतीय हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने छिंदवाड्यासाठी प्रयाण झाले.

******

No comments:

Post a Comment