Thursday, 5 October 2017

कोइम्बतूर येथे 23 ऑक्टोबरला सैन्यभरती

            मुंबईदि. 5 : प्रादेशिक सेनेच्या 110 इन्फट्री बटालियनमद्रासरेडफिल्डसकोईम्बतूरमार्फत दि.23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान सैन्य भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सोल्जर (जीडी) 8 पदे आणि सोल्जर (हाउसकीपर) ची 3 पदे भरण्यात येणार आहेअशी माहिती या बटालियनकडून देण्यात आली आहे.
            सैन्य भरतीसाठी शारीरीक चाचणी पीआरएस ग्राउंड कोईम्बतूर येथे सकाळी 6 वा.पासून आयोजित करण्यात आली आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी तसेच मुलाखत त्यानंतर आयोजित करण्यात येईल. नागरी क्षेत्र किंवा स्वयंरोजगारमाजी एनसीसी छात्र (उत्कृष्ट नेमबाज)उत्कृष्ट कलाकारपेंटरहलकेअवजड वाहनचालक परवानाधारकसंगीतकारसैनिकमाजी सैनिकांचे अवलंबित यांना प्राधान्य दिले जाईल. नागरी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचा-यांना आपल्या कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे लागेल.
            उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षाच्या दरम्यान असावे. उंची 160 सेंटीमीटरवजन 50 किलोग्रॅम आणि छाती 77 सें.मी. तर फुगविल्यानंतर 82 सें.मी असावी. सोल्जर (हाउसकीपर) पदासाठी उमेदवार किमान8वी पास आणि हाउस किपींग प्रशिक्षित असावा. सोल्जर (जीडी) पदासाठी उमेदवार किमान 45 टक्के गुणांनी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा किंवा 12 वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेला असावा.
            भरतीसाठी येतांना उमेदवारांनी सोबत - 10 वी, 12 वीपदवीप्रमाणपत्र आणि गुणपत्रकेशाळा सोडल्याचा दाखलाप्राधिकृत अधिकाऱ्याच्या सहीचा अधिवास दाखला,  चारित्र्य प्रमाणपत्रपासपोर्ट साईज10 छायाचित्रेनातेवाईकांसोबतचे 5 एकत्रित छायाचित्रेकुटुंबाची 4 छायाचित्रेस्वत:चे पॅनकार्डस्वत:चे आणि कुटूंबातील सदस्यांचे आधारकार्डजातीचा दाखलाविवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखलापत्नीचे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रकमुलांचे जन्मदाखलेसंयुक्त बचत खातेअवलंबितांचे आधारकार्ड आणावेअसे आवाहनही बटालियनने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
000

No comments:

Post a Comment