Friday, 27 October 2017

गणपत पचारेच्या मृत्यूची होणार चौकशी

        नागपूर दि. 27 :  मध्यवर्ती कारागृहातील बंदी गणपत वासू पचारेच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पांडे यांच्यामार्फत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहे.
            गणपत वासू पचारे याचा 7 ऑक्टोबर 2017 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू होण्याची कारणे व परिस्थिती तसेच मृताच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या इतर संयुक्तिक कारणांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अथवा या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसिल कार्यालय, खोली क्रमांक 1 मधील कार्यालयात 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत सादर करण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी शिरीष पांडे यांनी केले आहे.
*****    

No comments:

Post a Comment