नगरभूमापन क्रमांक 2 व 3 साठी विशेष शिबिर
नागपूर, दि.27 : नगरभूमापन अधिकारी यांच्या कार्यालयाशी संबंधित नामांतरण प्रकरणात असलेल्या त्रुटयांची पुर्तता करण्यासाठी नगरभूमापन अधिकारी क्रमांक 2 व 3 या कार्यालयाशी संबंधित असलेल्या सर्व नामांतरण प्रकरणांचा निपटारा विशेष शिबिराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विशेष गाव व झोननिहाय 24 ऑक्टोबरपासून शिबिराला प्रारंभ झाला. शिबिरात 101 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 52 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातून सेतू केंद्रात ही प्रकरणे संकलित केल्या जातात. परंतु अशा प्रकरणात त्रुटया असल्यास नामांतरणाची कार्यवाही पूर्ण होत नाही. त्यामुळे नगरभूमापन अधिकारी क्रमांक 2 व 3 या कार्यालयाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
नगरभूमापन अधिकारी क्रमांक 3 या कार्यालयासंबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी खामला, भामटी, परसोडी, टाकळी सीम चिंचभूवन, सोनेगांव येथील प्रकरणासाठी 30 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी सभागृह चौक येथे, लेंड्रा, अंबाझरी, जयताळा, अजनी, सोमलवाडा येथील प्रकरणासाठी 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती नगर येथील छत्रपती शिवाजी सभागृहात, सिताबर्डी, जाटतरोडी, धंतोली, गाडगा येथील प्रकरणासाठी 1 नोव्हेंबर रोजी सिताबर्डी येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे, झिंगाबाई टाकळी, हजारीपहाड येथील प्रकरणासाठी झिंगाबाई टाकळी येथील हनुमान मंदीरात, 2 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
नगरभूमापन अधिकारी क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या वांजरा, वांजरी, बिनाकी येथील प्रकरणासाठी 30 ऑक्टोबर रोजी बिनाकी मंगळवारी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात, दिघोरी, हरपूर, वाठो डा, हिवरी येथील प्रकरणासाठी 31 ऑक्टोबर रोजी रमणामारोती चौक ज्योती माध्यमिक शाळेत, भांडेवाडी, पुनापूर, भरत वाडा, पारडी येथील प्रकरणासाठी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पुनापूर पारडी येथील भवानी मंदीरात, बाबुलखेडा, मानेवाडा येथील प्रकरणासाठी 2 नोव्हेंबर रोजी मानेवाडा रोडवरील सिध्देश्वर सभागृह येथे, सक्करदरा, चिखली खुर्द, बिडीपेठ येथील प्रकरणासाठी सिध्देश्वर सभागृह येथे 3 नोव्हेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment