नागपूर, दि. 4 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांची शिल्प निदेशक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिके संदर्भातील 23 ऑक्टोबर 2016 रोजी अंतरिम आदेशास अनुसरुन शिल्प निदेशक पदभरतीची जाहिरात रद्द करण्यात आली आहे. तरी अर्जदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक संचालक एम. पी. हांडे यांनी केले आहे. ही सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्याwww.rovetngp.org या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
******
No comments:
Post a Comment