जात प्रमाणपत्र पडताळणी
मुंबई, दि. 4 : जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबधातील नातेवाईकांचे पडताळणी समितीने दिलेल्या वैध जात प्रमाणपत्रास महत्वाचा पुरावा मानून जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र अनुसूचित जाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनीयमन) नियम2012 मधील नियमात 24 नोव्हेंबर रोजीच्या अधिसूचनांद्वारे सुधारणा केली आहे.
या अधिसूचनेद्वारे 2012 मधील नियमता पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. नियम क्र. 4 सक्षम प्राधिकाऱ्याकडून जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यपद्धती (घ) पडताळणी समितीने दिलेले, अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे उपलब्ध असल्यास वैद्यता प्रमाणपत्र, सदर वैधता प्रमाणपत्र दाखल केले असल्यास सदर वैद्यता प्रमाणपत्रास महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे.
प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती
अर्जदाराने त्याच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे स्वत:करिता त्याच जातीच्या जात प्रमाणपत्रास, जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास संबंधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदर अर्ज प्राप्त झाल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, या संस्थेचे संकेतस्थळ, संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील नोटीस बोर्ड यावर प्रसिद्ध करुन सदर अर्जदाराच्या मागणीबाबत काही आक्षेप असल्यास सदर माहितीच्या प्रसिद्धीपासून 15 दिवसात संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे नोंदविण्याबाबत कळविण्यात येईल. अर्जदाराच्या अर्जाबाबत कोणत्याही आक्षेप प्राप्त न झाल्यास त्यास जात वैद्यता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी इतर पुराव्याची मागणी न करता संबंधीत अर्जदारास त्यानी सादर केलेले रक्त संबंधातील जात वैद्यता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा मानून जात वैद्यता प्रमाणपत्र निर्गमित करेल.
अर्जाबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विहीत मार्गाने आक्षेपांची चौकशी/तपासणी 60 दिवसांच्या आज पूर्ण करेल. आक्षेपात तथ्य आढळून न आल्यास तात्काळ अर्जदारास जात प्रमाणपत्र निर्गमित करेल. आक्षेपात तथ्य आढळल्यास संबंधित जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समिती विहीत कार्यलयीन पद्धतीचा अवलंब करुन निर्णय घेईल.
000
No comments:
Post a Comment