नागपूर, दि.17 : महाराष्ट्र दुकाने व
आस्थापना (नोकरी व सेवाशर्तीचे विनियमन) 2017 हा नियम 19
डिसेंबर 2017 रोजी संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. हा मसुदा 2 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिध्द करण्यात आला
असून शासनाच्या mahakamgar.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच जिल्हा
कामगार कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर माहितीसाठी
हा मसुदा लावण्यात आला आहे.
नागरिकांना ह्या मसुद्यासंदर्भात हरकती वा सूचना असेल
त्यांनी त्या प्रधान सचिव (कामगार) उद्योग ऊर्जा कामगार विभाग, मादाम कामा,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे किंवा कामगार आयुक्त, कामगार
भवन, ई, ब्लॉक, सी-20, वांद्रे –कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई 400051 (mahalabourcommr@gmail.com)यांच्याकडे ई-मेलद्वारे
व्यक्तीश : किंवा टपालाने पाठवाव्या. अशा हरकती
व सूचना शासनाकडून विचारात घेण्यात येईल, असे अपर कामगार आयुक्त,नागपूर
यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment