*
चांदा ते बांदा योजनेची आढावा बैठक
*
चंद्रपूर जिल्ह्याने सादर केला 100.61 कोटीचा आराखडा
नागपूर,दि. 17 : चांदा ते
बांदा योजनेतंर्गत प्रस्तावित रोजगारभिमुख लघु उद्योगाद्वारे उत्पादीत मालाच्या
गुणवत्तेवर भर देण्यासोबतच स्थानीय महिला बचत गटांना विविध उत्पादन निर्मितीचे
प्रशिक्षण देऊन त्याच्या मदतीने एकाच ठिकाणी सामूहिक उत्पादनाची पद्धती विकसीत
करावी, अशा सूचना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या
सभागृहात चांदा ते बांदा योजना, चंद्रपूर जिल्हा सन 2017-18 आराखड्याचा आढावा
घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
बैठकीत वित्त व नियोजन राज्यमंत्री
दिपक केसरकर, नियोजन अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती विभागीय आयुक्त अनूप कुमार,
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी वने, वनोत्पादन व पर्यावरण,
कृषी, फलोत्पादन व संलग्न सेवा, पर्यटन विकास, जलसंधारण, उद्योग व खनिजविकास यावर
येणारा भांडवली खर्च 38 कोटी 5 लक्ष 67 हजार तसेच महसुली खर्च 57 कोटी 55 लक्ष 55
हजार याशिवाय 5 टक्के प्रशासकीय खर्चाच्या नियतव्ययाबरोबर चांदा ते बांदा
योजनेतंर्गत 100 कोटी 61 लक्ष 22 हजार रुपयाचा आराखडा सादर केला.
चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या योजनेद्वारे महिला
तसेच स्थानीय नागरिकांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या
पाहिजे. त्याच बरोबर दुग्ध व मत्सव्यवसाय विकासावर भर देत गट उत्पादनाला प्राधान्य
द्यावे, असे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून बांबू व बांबू पासून
तयार होणाऱ्या वस्तुकरिता बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याबरोबरच बांबूचे उत्पादन व
प्रक्रिया केंद्रात चांगल्या प्रतिचे यंत्र सामग्रीचा वापर करण्याचे राज्यमंत्री
दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.
सिंधूदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्यात सामुहिक रितीने अशा
प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. दोन्ही जिल्ह्यांनी समन्वय साधून अंतिम
आराखडा तयार करावा, अशा सूचना देखील वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
केल्या.
****
No comments:
Post a Comment