नागपूर, दि.17 : अधीक्षक मध्यवर्ती
कारागृह, नागपूर येथील कैदी मनसुक बुंदेल
उईके (50) यांच्या
मृत्यूची उपवभिागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी
रामटेक, यांना दिले. उईके यांचा 18 जानेवारी 2018 रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात
मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू होण्याची कारणे व परिस्थिती तसेच मृतकाच्या मृत्यूस
कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणांचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे. अथवा या
घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती
आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभागीय अधिकारी तथा
दंडाधिकारी, रामटेक येथे 22 फेब्रुवारी 2018 पूर्वी सादर करावे, असे उपविभागीय
दंडाधिकारी राम जोशी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment