Thursday, 15 February 2018

जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी 21 एप्रिल रोजी


नागपूर, दि. 15 : नवोदय विदयालय समिती (मनुष्यबळ विकास मंत्रालय, शाळा शिक्षण आणि साक्षरता विभागातंर्गत, स्वायत्त संस्था) च्या वतीने प्रशासकीय कारणास्तव इयत्ता 6वीं च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सत्र 2018-19 ची प्रवेश निवड चाचणी पुढे ढकलण्यात आलेली असून ही चाचणी आता शनिवार दिनांक 21 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.  
नवोदय विद्यालय समितीच्या वतीने शैक्षणिक सन 2018-19 ची निवड चाचणी सर्व जवाहर नवोदय विद्यालयात (उन्हाळी, हिवाळी, अति हिवाळी) एकाच दिवशी तसेच एकाच वेळी घेण्यात येणार आहे. संबंधित सर्व उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी. अधिक माहितीकरिता नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळ www.nvshq.org वर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव-खैरी यांनी केले आहे.
**** 



No comments:

Post a Comment