Thursday, 15 February 2018

वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा दौरा


नागपूर, दि. 15 :  वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून नागपूर विमानतळावर सकाळी 9.50 वाजता आगमन व रविभवनकडे प्रयाण. सकाळी 11.50 वाजता रविभवन येथून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11.55 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित नागपूर विभागीय जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीस उपस्थिती. सोईनुसार विभागीय आयुक्त कार्यालय येथून रविभवनकडे प्रयाण. रात्री 7.00 वाजता रविभवन येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण व रात्री 8.30 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
                                                                                                                             
                    कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील – निलंगेकर यांचा दौरा

  कौशल्य विकास व उद्योजकता, मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांचे मंगळवार, दिनांक 20 फेब्रुवारी  रोजी मुंबई येथून रात्री 8.35 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व  रविभवनकडे प्रयाण. रात्री रविभवन येथे मुक्काम.
बुधवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता रविभवन येथून गडचिरोलीकडे प्रयाण. गडचिरोली येथील स्थानिक कार्यक्रमाला उपस्थिती. गडचिरोली येथून रात्री 8.00 वाजता रविभवन विश्रामगृह नागपूर येथे आगमन व मुक्काम.
गुरुवार, दिनांक 22 फेब्रुवारी  रोजी दुपारी 1.00 वाजता फॉर्च्यून फाऊंडेशनतर्फे आयोजित युथ एम्पावरमेंट समिट कार्यक्रमास उपस्थिती.
                                                               
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा दौरा

  वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांचे शुक्रवार, दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भुसावळ येथून सकाळी 4.05 वाजता नागपूर रेल्वे स्थानक येथे आगमन व  पेंच विश्रामगृहाकडे प्रयाण.
सकाळी 4.30 वाजता पेंच शासकीय विश्रामगृह, नागपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता भूजल मंथन कार्यक्रमास उपस्थिती.  
****

             

No comments:

Post a Comment