Saturday, 17 February 2018

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेकरिता 28 फेब्रुवारीपर्यत अर्ज आमंत्रित


                                               
            नागपूर,दि. 17 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2017-18 महा-डिबीटी पोर्टलवरुन वगळण्यात आली असून उच्च शिक्षण संचालनाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी संबंधीत महाविद्यालयामध्ये योजनेचा लाभ घेण्याकरिता दिनांक, 28 फेब्रुवारी पर्यत ऑफलाईन पद्धतीने आवेदन करावे.
             शासन आदेशानुसार यापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2017-18 करिता महा-डिबीटी पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन आवेदन मागविण्यात आले होते. परंतू योजना पोर्टलमधून वगळण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 28 फेब्रुवारीपर्यत संबंधित महाविद्यालयामध्ये अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. महाविद्यालयांनी प्राप्त अर्ज परिपूर्ण तपासणी करून उच्च शिक्षण नागपूर विभाग, नागपूर या कार्यालयाकडे दिनांक 5 मार्चपर्यत सादर करावे, अशा सूचना उच्च शिक्षण नागपूर विभागाच्या सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी दिली आहे.
                
शैक्षणिक संस्थांनी 31 मार्चपर्यत नोंदणी करा 
                                                 
            नागपूर,दि. 17 : केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना 2018-19 च्या अंमलबजावणी करिता ज्या महाविद्यालय, संस्थांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarships.gov.in) च्या होम पेजवरील लींकवर महाविद्यालय किंवा संस्थांची नावे दिसत नसतील, अशा महाविद्यालय व संस्थांनी दिनांक 31 मार्च 2018 पूर्वी संबंधित पोर्टल वर पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे.
            सर्व महाविद्यालय किंवा संस्था कालावधीत नोंदणी करावी. अधिक माहितीकरिता संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन उच्च शिक्षण नागपूर विभागाच्या सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी केले आहे.    
****


No comments:

Post a Comment