Monday, 19 February 2018

सप्लाय चेनसाठी राज्य भौगोलिकदृष्ट्या उत्तम

'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' :
'लॉजिस्टीक आणि सप्लाय चेन या क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधीपरिसंवाद
 मुंबईदि19 : उद्योग व्यापार क्षेत्रात महत्वाची समजली जाणारी सप्लाय चेन उभारणी करण्यासाठी राज्य भौगोलिकदृष्ट्या उत्तम असल्याचे मत आज 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' या जागतिक गुंतवणूकपरिषदेत झालेल्या एका परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केलेजागतिक व्यापारवृद्धीच्या अनुषंगाने लॉजिस्टीक आणि सप्लाय चेन याक्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.यात उद्योजक प्रदीप बॅनर्जीरमेश नायरहान्डे डिल्टेमीस आणि अमीत कुमार हे सहभागी होते.
            या परिसंवादात झालेल्या चर्चेतून अनेकबाबी पुढे आल्याराज्यात बदललेल्या उद्योग स्नेही धोरणांमुळे आता राज्यात गुंतवणूक करणे सोपे आणि आश्वासक झाले आहेवाढते शहरीकरण आणि  बदलत्यापरिस्थितीत या उद्योगासाठी लागणाऱ्या गरजा बदलल्या आहेतत्यादृष्टीने नव्या साधनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहेयेत्या दहा वर्षात याक्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्याचे चित्र बदलणार आहेत्यादृष्टीनेराज्यात सकारात्मक बदल घडत आहेत यावर उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.

000

No comments:

Post a Comment