Monday, 19 February 2018

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन



        नागपूर, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शैलेश मेश्राम, रविंद्र माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   

 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
        नागपूर, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजानजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, शिरीष पांडे, बी.एस.घुगे, तहसिलदार जे.बी. पोहनकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   

******

No comments:

Post a Comment