Monday, 19 February 2018

पायाभूत सुविधांमध्ये राज्य अग्रेसर दहा वर्षात राज्याचे चित्र बदलणार

'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018' :
'पायाभूत सुविधांमधून विकासपरिसंवाद
 मुंबईदि19 पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहेयेत्या दहा वर्षात राज्याचे चित्र बदलणार असल्याचा सूर 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018या जागतिक गुंतवणूक परिषदेत लावण्यात आलाआहेया परिषदेच्या निमित्ताने अनेक परिसंवादचर्चा आयोजित करण्यात आल्या आहेतया चर्चांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच गुंतवणूकदार उद्योजक सहभागी झाले आहेत.
समृद्धी महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधा
            राज्यातील पायाभ सुविधांच्या  विकासाचे जाळे मजबुत करुन राज्यातील प्रगतीला चालना देण्यात येत आहेसमृद्धी महामार्गामुळे 14 शहरे जोडले जाणार असून या परिसरातील लोकांना रोजगाराच्या संधीउपलब्ध झाल्या आहेतअसे रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले.
            'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित पायाभूत सुविधांमधून विकास या विषयावरील परिसंवादात ते बोलत होतेया परिसंवादाला एमएमआरडीए आयुक्त यु.पी.एस.मदानउद्योजक विशाल वांचूटकेना सकामोटासंजय उबाळे  इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री मोपलवार यांनी केलेल्या सादरीकरणात राज्यात निर्माण होणार असलेल्या रस्त्यांच्या जाळ्याचे तसेच महत्वाकांक्षी अशा समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर माहिती दिली.  पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीसुमारे 200 हजार कोटी  रुपयांची  गुंतवणूक राज्य करित असल्याचेही त्यांनी सांगितलेमुंबई पुणे महामार्ग तयार करताना आलेल्या अडचणी आणि  तयार झाल्यानंतर लक्षात येणा-या कमतरता यांचा सर्वंकष विचारकरून समृद्धी महामार्गाचे नियोजन करण्यात येत आहे.ज्या 19 ठिकाणांहून रस्ते एकमेकांना छेद देत आहेत तिथे अत्याधुनिक वसाहती निर्माण करण्यात येत आहेतहा महामार्ग तयार होत असतांना आणि झाल्यानंतर 30हजार प्रत्यक्ष आणि 60 हजार अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे.
पायाभूत सुविधांमधून राज्याची प्रगती
            राज्यात वाढती वाहतूक आणि परवडणारी घरे या दोन समस्या आहेतयावर उपाय करण्यासाठी राज्याने आश्वासक पाऊले उचलली आहेतअसे श्रीमदान यांनी सांगितलेत्यांनी राज्यातील इतर वाहतूकपर्यांयांबाबत सादरीकरण केलेसबअर्बन रेल्वेमेट्रो आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यायी वाहतूक मार्ग निर्माण होत आहेविरार ते अलिबाग असा मल्टी मोडल कॉरिडॉर तयार होणार आहेयाबाबतची कार्यवाहीसुरू झाली आहेयासोबतच बीकेसी ते विमानतळ हे अंतर केवळ दहा मिनीटात पोहचण्याची व्यवस्था निर्माण होत आहेसुमारे 1 लाख 73 कोटीची कामे सुरू असून येत्या पाच वर्षात ती पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
***


No comments:

Post a Comment