मुंबई, दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी विधानपरिषद सदस्य रामभाऊ गुंडुले, विधानमंडळाचे सहसचिव अशोक मोहिते, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, राजू पटेल, बालाजी गवारे, अवर सचिव रवींद्र जगदाळे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी पारंपरिक वेषातील तुतारीवादकांनी सनई-चौघड्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
0 0 0 0 0 0


No comments:
Post a Comment