मुंबई, दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासनाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, अवर सचिव श्री. वाव्हळ, कक्ष अधिकारी श्री. गोसावी, श्री. पालवे यांनीही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयातील अॅनेक्स इमारतीमध्ये असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेलाही मंत्रीद्वयांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
0000


No comments:
Post a Comment