Friday 31 August 2018

जिल्हा पुरस्कारासाठी यशस्वी उद्योजकांकडून अर्ज आमंत्रित

नागपूर, दि. 31 : उद्योजकांमध्ये जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी, त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शासनाच्या वतीने यशस्वी उद्योजकांना जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यशस्वी उद्योजक सन 2018 च्या जिल्हा पुरस्कारासाठी दिनांक, 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतील.
यशस्वी उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी स्थायी नोंदणी (एम एस एम ई-) असलेले, वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नसलेले तसेच सलग 2 वर्षे उत्पादनात असलेल्या लघु उद्योजकांना पात्र मानण्यात येईल.
सन 2018 करिता लघु उद्योजक पुरस्कारासाठी अर्ज सादर करताना एन्टरप्रेन्युअर मेमोरंडम पार्ट 2 मेमोरंडम उद्योग आधार मेमोरंडम स्विकृत केल्याच्या एक्नॉलेजमेंटची संपूर्ण प्रत, मागील 3 वर्षातील ताळेबंद, बँकेचे-वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. लघु उद्योजकास यापूर्वी जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झालेला नसावा. अनुसूचित जाती, जमाती, अपंग तसेच महिला उद्योजकास विशेष प्राधान्य देण्यात येईल.
प्राप्त अर्जातून निवडण्यात आलेल्या यशस्वी उद्योजकांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कारस्वरूप 15 हजार व 10 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देण्यात येईल. पुरस्कारासंबंधी अधिक माहितीकरिता जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, 2 रा माळा, सिव्हील लाईन, नागपूर, दुरध्वनी क्रमांक 0712-2565974 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****

No comments:

Post a Comment