Friday 31 August 2018

आजपासून मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण अभियान

नागपूर, दि. 31 : राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरुवात शनिवार 1 सप्टेंबरपासून करण्यात येत आहे. दिनांक, 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर दरम्यान मतदार यादीत नाव नोंदणी करण्यापासून ते विविध प्रकारच्या दुरुस्ती करण्याची मतदारांना संधी राहील.
 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण अभियानांतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना देखील नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करता येईल. याशिवाय नावात दुरुस्ती, पत्त्यात बदल, दुबार नावे, स्थलांतरीत झालेल्या मतदारांना दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येणार आहे. दिनांक 1 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, मतदार मदत केंद्र, संबंधित विधानसभा मतदार संघातील कार्यालय, विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मतदारांना आवश्यक फार्म नंबर 6, 6अ, 7, 8, 8 अ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
केंद्र निवडणूक आयोगाच्या ‘एकही मतदार वंचित राहू नये’ या घोषवाक्यासह सुरु करण्यात विशेष मतदार नोंदणी अभियानाचा जास्तीत जास्त मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment