नागपूर, दि. 5 : एकात्मिक आदिवासी प्रकल्प, नागपूर अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन 2017-18 व 2018-19 मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्तरीय नियोजन समितीची बैठक बचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमोद कौरती यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता व पारदर्शकता असावी. तसेच आदिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे कर्तव्य व जबाबदारी दक्षतेने पार पाडावी व योजनांची विहित वेळेत अंमलबजावणी करावी, अशाही सूचना यावेळी प्रकल्पस्तरीय नियोजन समितीमार्फत देण्यात आल्या.
यावेळी प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समितीचे प्रकल्प अधिकारी डिंगाबर चव्हाण, प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समितीचे सदस्य शिवकुमार कोकोडे, राजू मडावी, जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती तथा सदस्य श्रीमती पुष्पा वाघाडे तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समितीच्या बैठकीस उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार नियोजन अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अमित सुतार यांनी मानले.
*****
No comments:
Post a Comment